Blog

प्रवास जाणिवांचा!

Posted by : Dr. Satish Pawar

November 15, 2017

Share this

काही घटना पुन्हा पुन्हा घडत जातात आणि त्याविषयी समाजाच्या जाणिवा बोथट होत जातात. विदर्भ मराठवाडयातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांबदद्लही काहीशी अशीच परिस्थिती. यात अचानक कहर झाला तो यवतमाळ जिल्हयात अचानक औषध फवारणीमुळे विषबाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मॄत्यूमुळे. अवघ्या 3 महिन्यातच आठशेपेक्षा अधिक शेतकरी यात अत्यवस्थ झाले. शासकीय रूग्णालये, संबंधित डॉक्टर्स, सर्वचजण या आपत्तींना नियमीतरित्या सामोरे जात असल्यामुळे एका ठराविक मॄत्युदराची सवय सर्वांनाच झालेली. अनेक वर्षे या परीस्थीतीला, या मृत्यूना थांबवण्याची र्इर्षा बाळगलेली व्यक्ती या महाराष्ट्रातच होती. ना की फक्त महाराष्ट्रातील पण संपूर्ण जगाला तिच्या संशोधनाने दिशा दाखवलेली! शेतात वापरली जाणारी कीटकनाशक औषधे पिउन अथवा श्वसनातून वा त्वचेतून त्याची बाधा झालेली रूग्ण वाचवण्यासाठी त्यांनी केलेल्या संशोधनाची दखल, लंडनहून प्रसिध्द होणाऱ्या, जागतिक पातळीवरील सर्वाधिक मान्यताप्राप्त मेडिकल जरनल ‘The Lancet’ ने घेतली होती. पुरस्कार, सन्मानांचा त्यांच्यावर वर्षाव झाला होता; परंतु एक संशोधन करून एखादया नियतकालिकात छापले जाणे हे त्या संशोधिकेचे स्वप्न कधीच नव्हते, तर त्या संशोधनाचा उपयोग होउन, अत्यवस्थ रुग्णांचा जीव वाचावा, हाच एक ध्यास त्या डॉक्टर संशोधिकेचा होता. यवतमाळमध्ये फवारणी यंत्रातील दोषामुळे अशा औषधांचे ढग तयार होउन अनेक निष्पाप शेतकरी व शेतमजूर अत्यवस्थ होऊ लागले. अशा रूग्णांना वाचविण्याची धडपड केली ती बारामतीच्या एका डॉक्टरांनी! चांगल्या कामासाठी शासकीय यंत्रणाही खुप चांगली मदत करू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. सामाजिक कामात धन्यता मानणाऱ्या एका व्यक्तीनेही त्यांना अमूल्य मदत केली व अवघ्या एका दिवसात त्या डॉक्टर यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये विषबाधित क्षेत्रातील तब्बल 150 डॉक्टर्स समोर उभ्या राहू शकल्या. प्रााथमिक आरोग्य केंद्रापासून मेडिकल कॉलेज आयसीयू पर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपण विषबाधित रूग्णाला वाचवण्यासाठी कशी पराकाष्ठा करू शकतो हे त्यांनी सर्वाना समजावून सांगितले. त्यांचे गेल्या 17 वर्षांतील संशोधन त्यांना कसे उपयोगी पडू शकते याची त्यांना माहिती सांगितली. औषध प्यालेला पण जिवंतपणे दवाखान्यापर्यंत पोहोचलेला प्रत्येक अत्यवस्थ रूग्ण आपण कसा वाचवू शकतो याचे अत्यंत प्रभावी मार्गदर्शन त्यांनी केले. दीड तास चाललेल्या या मार्गदर्शनपर भाषणाने उपस्थित सर्वांची मने जिंकली. टाचणी पडली तरी आवाज होर्इल इतक्या तन्मयतेने प्रत्येकाने ते मार्गदर्शन ऐकले. वैदयकीय श्रेत्रातील प्रत्येक कडीने आपले कर्तव्य काटेकोरपणे बजावले तर भविष्यात कीटकनाशके पिउन होणाऱ्या आत्महत्येचे लोणच नामशेष होर्इल हा विश्वास त्यांनी प्रत्येकात जागवला. एक संवेदनशील मन घेउन सामाजिक जाणिवांचा हा एक धडपडणारा प्रवास केला तो बारामतीच्या डॉ. कीर्ती पवार यांनी. सामाजिक कार्यकर्त्या अश्विनीजी दरेकर तसेच डॉ सतीश पवार व सम्राज्ञी पवार यांनी त्यांच्या ध्येयास व त्यांच्या तळमळीला अमूल्य साथ दिली. त्यामुळे एका छताखाली एका वेळी 150 डॉक्टर्स जमा झाले. त्यामुळे रूग्णांना वाचवण्यासाठीच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप मिळले व विदर्भासाठी एक इतिहास घडला. भविष्यात विष पिऊन घडणाऱ्या आत्महत्येतील मॄत्युदर कमी होउ शकला तर 8 ओक्टोबर 2017 हा दिवस विदर्भाच्या इतिहासात नक्कीच नोंदला जाईल. महाराष्ट्राचे डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसेस, डेप्यूटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसेस, नागपूर, अकोला, तसेच सर्व सिव्हील सर्जन्स् व गव्हर्नमेंट मेडीकल कॉलेज नागपूर व यवतमाळ येथील डीन व मेडीसीन डिपार्टमेंटस्, व यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि डॉ. कीर्ती व डॉ.सतीश पवार यांच्या निस्वार्थी प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल व हा जाणिवांचा प्रवास सार्थकी लागेल! विशेष कौतुक डॉ.सतीश पवार व डॉ.कीर्ती पवार यांच्या कन्येचे. कॉलेजमधील नवरात्रीचे कार्यक्रम सोडून दुसऱ्या वर्षात शिकणारी सम्राज्ञी पवार तत्परतेने मुंबर्इहून नागपूरला पोहोचली, ती आर्इ वडीलांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना साथ देण्यासाठीच! अशावेळी कोण म्हणेल की आजची पीढी व्हाट्स अँप व आभासी दुनियेच्या पलीकडे विचार करत नाही. कळत नकळत आर्इ वडीलांच्या या सामाजिक जाणिवांची वारसदार ही एक कन्या ठरत आहे! ऍडव्होकेट लक्ष्मणराव देशमुख.


What is osteoporosis.?

Posted by : Dr. Satish Pawar

March 5, 2016

Share this

Osteoporosis is a disorder of the bones in which the bones become brittle, weak and easily damaged or broken. A decrease in the mineralization and strength of the bones over time causes osteoporosis. Bone density reaches its peak around 25 years and decreases after 35 years, decreases more rapidly in women after menopause. Patients with osteoporosis may have no symptoms until bone fractures occur. Osteoporosis can be diagnosed using X rays, DEXA scans or ultrasound bone densitometry. Patients with osteoporosis may have no symptoms until bone fractures occur. Bone mineral density test A bone mineral density (BMD) test measures how much calcium and other types of minerals are in an area of your bone. This test helps your health care provider detect osteoporosis and predict your risk of bone fractures. Why the Test is Performed Bone mineral density (BMD) tests are used to: • Diagnose bone loss and osteoporosis • See how well osteoporosis medicine is working • Predict your risk of future bone fractures Who should have bone mineral testing or screening • A woman, age 65 or older • A man, age 70 or older Women under age 65 and men ages 50 to 70 are at increased risk of osteoporosis if they: • Have a broken bone caused by normal activities, such as a fall from standing height or lower (fragility fracture) • Have chronic rheumatoid arthritis, chronic kidney disease, or eating disorders • Have early menopause (either from natural causes or surgery) • History of hormone treatment for prostate cancer or breast cancer • Significant loss of height due to compression fractures of the back • Cigarette Smoking • Strong family history of osteoporosis • Taking corticosteroid medicines (prednisone or methylprednisolone) every day for more than 3 months • Taking thyroid hormone replacement • Excessive alcohol consumption • Lack of calcium and Vitamin D • Lack of exercise When you should repeat the scan? • Current practice recommends BMD retesting every 2 years. Normal Results The results of your test are usually reported as a T-score and Z-score: • T-score compares your bone density with that of a healthy young women. • Z-score compares your bone density with that of other people of your age, gender, and race. With either score, a negative number means you have thinner bones than average. The more negative the number, the higher your risk of a bone fracture. A T-score is within the normal range if it is -1.0 or above. What Abnormal Results Mean Bone mineral density testing does not diagnose fractures. Along with other risk factors you may have, it helps predict your risk of having a bone fracture in the future. Your provider will help you understand the results. If your T-score is: • Between -1 and -2.5, you may have early bone loss (osteopenia). • Below -2.5, you likely have osteoporosis.

Bone mineral density (BMD) tests are used to: Diagnose bone loss and osteoporosis. See how well osteoporosis medicine is working. Predict your risk of future bone fractures.